Antibiotics | अनेक लोक हे कोणताही आजार झाला की, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अँटिबायोटिक्सच्या औषधांचे सेवन करतात. परंतु जे लोक सातत्याने सेवन करतात. त्यांच्या शरीरावर देखील त्याचे विपरीत परिणाम होत असतात. अशातच आता एका अभ्यासात एक धक्कादायक खुलासा झालेला आहे. या खुलासानुसार अँटिबायोटिक्स (Antibiotics) रेजिस्टेंस मुळे 2015 पर्यंत जगातील जवळपास चार कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. असे भाकित त्यात करण्यात आलेले आहे. 2022 ते 2050 या काळामध्ये अँटी मायक्रोबियल रेजिस्टेंसमुळे होणाऱ्या मृत्यूचा प्रकार 70 टक्के पर्यंत वाढू शकतो. असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे 2025 पर्यंत ही अत्यंत चिंतातायक बाब बनणार आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूटान, मालदीव, नेपाळ, श्रीलंका यांसारख्या देशांचा समावेश असणार आहे. तसेच आफ्रिकेमध्ये देखील खूप मृत्यू होण्याची शक्यता आहे.
संशोधकांचं असे म्हणणे आहे की, आजकाल अँटिबायोटिक्सचा (Antibiotics) वापर जास्त होत आहे. आणि मुळात तो खूप चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. यामुळे बॅक्टेरियावर जास्त जबाब येतो. ज्यामुळे बॅक्टेरिया एकाही कालांतराने रेजिस्टेंस बनत आहेत. त्यामुळे एंटीबायोटिक्सचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केला पाहिजे. तसेच तो योग्य पद्धतीने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केले केला पाहिजे
जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणणे आहे की, हा रेजिस्टेंस कॉमन इन्फेक्शनवर उपचार करताना अत्यंत त्रासदायक होत आहे. केमोथेरपी आणि सिजेरियन यांसारख्या मेडिकल कंडिशनसाठी देखील ते खूप रिस्की बनत चाललेले आहे. यासाठी 204 देशातील जवळपास 50 कोटींपेक्षा अधिक हॉस्पिटलमध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे
या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की, 1990 ते 2021 यादरम्यान दरवर्षी अँटी बायोटीक्सच्या सेवनाने दहा लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि पुढे जाऊन भविष्यात ही संख्या वाढू देखील शकते. तसेच पुढे जाऊन 3.90 कोटींपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात. आणि दर मिनिटाला जवळपास 3 मृत्यू होतील असे सांगण्यात आलेले आहे. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, मुलांना जर अँटिबायोटिक्सचे जास्त सेवन केले, तर काही वर्षानंतर तरुणांची संख्या देखील कमी कमी होत जाईल.