पंचकुला | नामवंत कबड्डीपट्टू आणि पूर्वीचे भारतीय कब्बडी संघाचे कप्तान राहिलेले अनुप कुमार यांनी बुधवारी संन्यास ची घोषणा केली. अर्जुन पुरस्कार विजेते अनुप ने २००६ मध्ये द.आशियाई खेळात श्रीलंकेविरुद्ध आपल्या करिअर ची सुरुवात केली होती.
२०१० ते २०१४ या दरम्यान आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकणारे अनूप एकमेव व्यक्ती होते. ३५ वर्षीय अनूप २०१४ मध्ये भारतीय संघाचे कॅप्टन होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१६ मध्ये विश्व कप जिंकला होता. प्रो कबड्डी च्या दुसऱ्या पर्वात “यू मुंबा” ने त्यांच्या नेतृत्वात “खिताब” मिळवला होता.
अनूप ने संन्यास घोषणेवेळी सांगितलं की, “जेव्हा मी कबड्डी खेळायला सुरुवात केली तेव्हा हा माझा छंद होता जो वेळेनुसार माझ्या जीवनाचा एक भाग बनला. मी त्या नशीबवान लोकांमध्ये सामील आहे ज्यांना स्वतः च स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळते. अनूप म्हणतात, आज प्रो कबड्डीद्यारे खेळ उत्तम वाटचाल करत आहे. आणि मला याचा आनंद आहे की, मी या खेळात सहभागी होतो. हा मंच माझ्या जीवनाचा सर्वात मोठा भाग होता त्यामुळे संन्यासा साठी मी याच मंचाची जागा निवडली. आश्चर्य म्हणजे, आजच माझ्या मुलाचा १० वा वाढदिवस आहे त्यामुळे हा दिवस अजूनच माझ्यासाठी “यादगार”राहील.
इतर महत्वाचे –
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी
सांता रात्रीच्या वेळीच गिफ्ट का देतो? जाणुन घ्या
1971 च्या युद्धात भारताचा सहयोगी बनला होता एक ” पाकिस्तानी सैनिक”