मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारा पक्ष अन्वय नाईक प्रकरणी गप्प का?? नाईक मायलेकिंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुकेश अंबानी आणि मनसुख हिरेन प्रकरणी विधानसभेत जोरात आक्रमक होऊन विधानसभा हादरवून सोडणारे विरोधी पक्षनेत्यांनी तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात (Anvay Naik) का घेतली नाही. मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर जिलेटिननं भरलेली गाडी सापडल्यावर विधानसभेत आक्रमक होणारा, गदारोळ करणारा पक्ष आमच्या प्रकरणात शांत का?, असा सवाल नाईक मायलेकींनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून CDR दिला जातो. मग आम्हाला तसा CDR का मिळाला नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या मुलीने केला. आमच्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. मग तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवाल नाईक यांच्या मुलीने उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे बिलकूल ऐकून घेतले नाही, आम्हाला दाद दिली नाही, असा थेट आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला

अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ अन्वय नाईक यांनी उभारून दिला. त्याचे पैसे थकवल्यानं, गोस्वामींनी धमक्या दिल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाला ३ वर्ष उलटूनही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र पोलिसांचं तोंड काळं झालं असं फडणवीस म्हणतात. असं बोलणं फडणवीस यांना शोभतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment