सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली. पीएसआय रियाज काझी याला एनआयएने कटात सामील असल्यामुळे व पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती आहे. यापूर्वी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएनं रियाझ काझी यांची चौकशी केली होती. अखेर आज त्यांना अटक करण्यात आली.

काझी 2010 सालच्या 102 व्या बॅचमधील अधिकारी आहेत. यापूर्वीसीआययु पथकाने केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सचिन वाझे यांच्यासोबत एपीआय रियाझ काझी आणि एपीआय होवोळ देखील सहभागी होते.

यामध्ये टीआरपी घोटाळ्याचा तपास, डिसी अवंती कार घोटाळा, फेक सोशल मीडिया फॉलोवर्स प्रकरण आणि कंगना हृतिक वाद प्रकरणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करताना सीआययु युनिटने बजावलेल्या भूमिकेत एपीआय रियाझ काझी यांचाही वाझे यांच्यासोबत सहभाग होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment