हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मागे झालेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल १५ टक्के कमी मतदान झाल्यामुळे या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार अशी शंका वाटत असतानाच वेगवेगळ्या सर्व्हेमधून बाहेर येत असलेल्या माहितीतून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येत असल्याचं चित्र आहे.
एक्झिट पोलमध्ये बहुतेक लोकांनी आम आदमी पक्षाला ५० ते ५८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. भाजपला सकारात्मक भूमिका घेणाऱ्या सुदर्शन वाहिनीनेही आम आदमी पक्षाला ४५ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या जागांमध्येही १ ते ३ अशी वाढ दर्शवली असून त्यांना इतक्याच जागा मिळतील असा अंदाज आहे. एकूणच जनता अरविंद केजरीवाल यांना अजून ५ वर्षं काम करण्याची संधी देणार हे चित्र एक्झिट पोलमधून तरी स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्व ७० जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस ६६ आणि भाजप ६७ जागा लढवत आहेत. भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी ३ जागा सोडल्या आहेत. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार वगळता यावेळी १४८ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.