हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चित्रपट क्षेत्रात जगात सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांचं वितरण शनिवारी होणार आहे. अमेरिकी प्रमाणवेळेनुसार ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी ९ फेब्रुवारी रोजी होणार असून भारतात याचं थेट प्रक्षेपण पहाटे ५.३० वाजता होणार आहे.
जगभरातील प्रेक्षकांना स्टार मुव्हीज आणि स्टार मुव्हीज सिलेक्ट एचडी या वाहिन्यांवर हा पुरस्कार सोहळा थेट पाहाता येईल. शिवाय हॉटस्टार आणि हुलू या ऑनलाईन अॅपवर देखील ऑस्कर सोहळा पाहता येणार आहे.
कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल. ‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅण्ड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी पुरस्कार देण्यासाठी लिओनार्डो दीकॅप्रिओ, अॅमी अॅडम्स, सॅम्युअल एल जॅक्सन, स्कार्लेट जॉन्सन, ड्वाइन जॉन्सन, ब्री लार्सन, हॅले बेरी, जॅमी डोर्नन, डकोटा जॉन्सन, एमा स्टोन, चार्लीझ थेरॉन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘जोकर’ या कॉमिक बूक खलनायकावर आधारित चित्रपटाला तब्बल ११ विभागांमध्ये नामांकन मिळालं असून ‘जोकर’ किती पुरस्कार घेणार याकडे सर्व चित्रपट रासिकांचं लक्ष लागून राहील आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.