Apple Recruitment 2024 | ॲपल अंतर्गत तरुणांना मिळणार 6 लाख नोकऱ्या; महिलांसाठी 70 % संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Apple Recruitment 2024 | देशामध्ये टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे आता या इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची संधी देखील वाढत आहे. अनेक लोकांना यामुळे नोकरी मिळत आहे. आपण जर आता पाहिले तर भारतामध्ये ॲपल (Apple Recruitment 2024) युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक लोक हे ॲपलचे फोन आणि इतर वस्तू वापरतात. खास करून मोबाईलच्या विक्रीमध्ये भारतामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आता आपल्या देशात ॲपल कंपनीच्या माध्यमातून नोकरीच्या संधी देखील निघालेल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार ॲपल कंपनीकडून यावर्षी भारतामध्ये तब्बल 6 लाख नोकरीची भरती निघालेली आहे. या नोकऱ्यांमध्ये महिलांना जास्त संधी आहे

ॲपल (Apple Recruitment 2024) कंपनीने भारतात एक खूप मोठी भरती काढलेली आहे. आणि या कंपनीसोबत जवळपास 2 लाख उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि यातील खास गोष्ट म्हणजे 70 टक्के महिलांना यामध्ये संधी असणार आहे. या आर्थिक वर्षात मार्चपासून या नोकरीच्या भरतीला सुरुवात होऊ शकते. ॲपलकडून चीनमधील उत्पादन कमी झालेले आहे. आणि भारतामध्ये हे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्यामुळेच आता भारतामध्ये रोजगाराची संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. देशातील अनेक युवकांना आता नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांमध्ये जवळपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 6 लाख कामगारांना रोजगार मिळणार आहे.

यावर्षी भारतामध्ये ॲपलची (Apple Recruitment 2024) विक्री वाढल्याने भारतात नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे. अनेक जॉब देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. ब्लू कॉलर जॉब निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये आता ॲपलचा मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आहे. त्यामुळे अनेक युवकांना आता नोकरी मिळत आहे. आणि खास करून महिलांना या कंपनीमध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, 2020 मध्ये आय स्मार्टफोन प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमनंतर ॲपलचे वेंडर जवळपास 1 लाख 65 हजार एवढ्या नोकऱ्या निर्माण करू शकलेले आहेत. यामुळे आता अनेक नोकऱ्यांची संधी देखील निर्माण होत आहे. आणि याचा फायदा भारतातील तरुणांना नक्कीच होणार आहे.