सातारा | नवीन शिधावाटप दुकान मंजूर करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. जिल्ह्यातून 123 जाहीरनामे करण्यात आले आहेत. परवान्यांसाठी अर्ज करण्याची मुदत 10 सप्टेंबरपर्यंत असून, रास्त भाव दुकान परवान्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.
शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्यांच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्थांनी अर्ज करावेत. जाहीरनामे प्रसिद्ध केलेल्या दे दुकानांची संख्या पुढीलप्रमाणे. सातारा 3, कोरेगाव 19, जावली 12, वाई 17, खंडाळा 14, महाबळेश्वर 22 पाटण 13, कराड 5, फलटण 9, माण 4 व खटाव 5 याप्रमाणे 123 जाहीरनामे काढण्यात आले आहे.
परवान्यांसाठी अर्ज करण्याची मुदत 10 सप्टेंबरपर्यंत आहे. अर्ज संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे विहित नमुन्यात सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा शाखेस अथवा 02162- 234840 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.