MHADA Lottery 2024| घर घेण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. परंतु घरांच्या किमतीत महाग असल्यामुळे हे स्वप्न प्रत्येकाचे पूर्ण होत नाही. सर्वसामान्यांच्या या स्वप्नाला भरारी देण्याचे काम म्हाडा (Mhada Homes) करते. म्हाडाकडून ठरलेल्या कालावधीत घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येते. गेल्या महिन्यातच पुणे म्हाडा मंडळाने घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या लॉटरी साठी अनेकांना अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
याच मागणीला विचारात घेऊन म्हाडाने घरांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची संख्या 100 ने वाढवली आहे. म्हाडाने लॉटरी जाहीर करताना ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल अशी ठेवली होती. परंतु आता लोकांच्या मागणीमुळे या तारखेत 30 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 30 मे पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करता येऊ शकतो. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनेकजणांना दिलासा मिळाला आहे.
ऑनलाइन अर्ज कुठे करावा?? (MHADA Lottery 2024)
पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर सविस्तर माहिती जाणून घेऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. म्हाडाच्या सोडतमध्ये तुमचे नाव जाहीर झाल्यास आवश्यक प्रक्रियेनंतर तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. (MHADA Lottery 2024)
आवश्यक कागदपत्रे (MHADA Lottery 2024)
- आधारकार्ड, पॅनकार्ड
- वास्तव्याचा पुरावा
- डोमासाईल सर्टिफिकेट
- उत्पनाचा पुरावा
- पती/पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावा