NEET UG 2025| नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET UG 2025) साठी अर्ज प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 7 मार्च 2025 पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. कारण त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. तर हे सर्व महत्त्वाच्या तारखा तपासून अभ्यासाचे नियोजन करावे.
अर्ज कधी आणि कुठे करायचा?
NEET UG 2025 साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ neet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 मार्च 2025 रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत आहे. याच तारखेला परीक्षा शुल्क देखील भरावे लागेल. अर्ज प्रक्रियेनंतर 9 मार्च ते 11 मार्च 2025 या कालावधीत उमेदवारांना अर्जातील चुका सुधारण्याची संधी दिली जाईल.
NEET UG 2025 चा महत्त्वाच्या तारखा
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 7 मार्च 2025
फी भरण्याची अंतिम तारीख – 7 मार्च 2025
अर्जात सुधारणा करण्याची मुदत – 9 मार्च ते 11 मार्च 2025
परीक्षा केंद्र (सिटी स्लिप) जाहीर होण्याची तारीख – 26 एप्रिल 2025
ॲडमिट कार्ड उपलब्ध होण्याची तारीख – 1 मे 2025
NEET UG 2025 परीक्षा – 4 मे 2025
निकाल जाहीर होण्याची शक्यता – 14 जून 2025
NEET UG 2025 अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण प्रवर्ग (General) उमेदवारांसाठी – 1700
OBC (नॉन-क्रीमी लेयर) आणि EWS उमेदवारांसाठी – 1600
SC/ST/PwD आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी – 1000
NEET UG 2025 साठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत संकेतस्थळ neet.nta.nic.in वर भेट द्या.
- “Registration for NEET UG 2025” लिंकवर क्लिक करा.
- नाव, ईमेल आयडी, संपर्क क्रमांक आणि इतर मूलभूत माहिती प्रविष्ट करून खाते तयार करा.
- लॉगिन करून आवश्यक शैक्षणिक व व्यक्तिगत माहिती भरा.
- परीक्षा केंद्र निवडून अर्ज सादर करा आणि आवश्यक शुल्क जमा करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.
परीक्षा पद्धत आणि वेळ
NEET UG 2025 परीक्षा 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केली जाणार आहे. एकूण 180 मिनिटे (3 तास) वेळ असलेल्या या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांवर आधारित प्रश्न असतील. दरम्यान, NEET UG 2025 ही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे उमेदवारांनी 7 मार्चपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.