सातारा | मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक संस्था, मा.वि.म. स्थापित लोकसंचलित साधन केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, उत्पादकांच्या सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रिगेटर, मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था महाराष्ट्र राज्य कृषि पणनमंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 10 ऑक्टोंबरपर्यंत संस्थांनी अर्ज करावेत.
राज्यातून पात्र अर्जांचे मुल्यांकन करुन मुल्यांकन निकषानुसार पहिल्या 60 लाभार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात येणारआहे. यामध्ये 40 शेतकरी उत्पादक संस्था व 24 मुल्यसाखळी गुंतवणुकदार यांची निवड करण्यात येणारआहे. राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपनन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅगनेट प्रकल्प कार्यान्वित आहे. उत्पादन ते ग्राहक अशा एकात्मीक मुल्य साखळ्याच्यां विकासासाठी या प्रकल्पाची आखणी केलेली आहे.
मॅगनेट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देशमुल्य साखळ्यामध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करणे, काढणीपश्चात नुकसान कमी करणे, साठवणुक क्षमता वाढविणे, मागणी नुसार मालाची मुल्यवर्धी करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्था चामुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे. मॅग्नेट प्रकल्पाचे प्रमुख तीन घटक पुढीलप्रमाणे. शेतकरी उत्पादक संस्थाचा क्षमता विकास, काढणी पश्चात सुविधासाठी अर्थसाह्य व निवडलेल्या पीकासाठी मुल्य साखळ्या विकसन.
कोल्हापूर विभागातून प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्यात 4 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 1 सहकारी संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 टक्केपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. प्रकल्प हा रक्कम रु. 1067 कोटीचा असून त्यापैकी रक्कम रु. 746 कोटी (70 टक्के) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरूपात असणार आहे. उर्वरित 30 टक्के रक्कम रूपये 321 कोटी राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे. कोल्हापूर विभागातील डाळींब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुल पिके इ. पिकांचा मॅग्नेट प्रकल्पात समावेश आहे.
प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षाचा असून, सन 2026-27 पर्यंत हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संकेतस्थळावर अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठीचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यातआलेलाआहे. Online अर्ज सादर करावयाची अंतिम दिनांक 10 ऑक्टोंबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे. तदनंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. अर्जदाराची नोंदणी करून अर्ज व मार्गदर्शक सूचना लिंक डाउनलोड करून लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यातीलअर्ज व कागदपत्रे online submit करावी. ईमेलद्वारे सादर केलेले लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून चेक लिस्ट प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयात सादर करावेत.