नवी दिल्ली | लोकसभेचे सभापती म्हणून राजस्थान मधील कोटा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला यांनी आज ११ वाजून १५ मिनिटांनी पदभार स्वीकारला. लोकसभेच्या प्रभारी सभापतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या प्रस्तावाला स्वीकृत करून ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापती पदी बिनविरोध निवड केली. मोदींचा प्रस्ताव लोकसभेत आवजी मतदानाने मंजूर केला आणि ओम बिर्ला लोकसभेचे सभापती झाले.
Delhi: MPs congratulate newly elected Speaker of Lok Sabha, Om Birla. pic.twitter.com/JzoOAou8YB
— ANI (@ANI) June 19, 2019
काल लोकसभेचे सभापती म्हणून ओम बिर्ला यांचे नाव भाजपच्या वतीने निश्चित करण्यात आले. ओम बिर्ला यांच्या नावासोबत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस. एस. अहलूवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार यांची नवे चर्चेत होती. मात्र ओम बिर्ला यांचे नाव जाहीर करून मोदी शहा यांच्या जोडीने पुन्हा एका सर्वांना धक्का दिला आहे.
ओम बिर्ला यांनी पदभार स्वीकारताच नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. अत्यंत नम्र असणारे ओम बिर्ला लोकसभेचे सभापती झाले आहेत. त्याचा मला खूप आनंद आहे. परंतु मला याची भीती देखील वाटते की त्यांच्या नम्रपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये. ओम बिर्ला हे २००३ , २००८, २०१३ अशा तीन राजस्थान विधानसभा निवडणुकीत कोट्यातूनच आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकीत ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपचे निष्ठावान नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याच प्रमाणे लोकसभा सभापती पदाचा जुना संकेत मोडून नवा पायंडा पाडण्यासाठी मोदी शहा जोडीने ओम बिर्ला यांची या पदी निवड केली आहे.