राज्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; कराडला अतुल म्हेत्रे नवे प्रांताधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सलकेन मुलाणी
राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश नुकताच जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रांताधिकारी उत्तम दिघे व सतारीचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांचा समावेश आहे. उत्तम दिघे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सावनेर नागपूर येथील उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सांगली जिल्ह्यातील मिरज येथील उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलावडे यांची सहाय्यक आयुक्त (मावक) पुणे पदी , उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांची उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर येथे, सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूरचे संतोष कुमार देशमुख, उप जिल्हाधिकारी पुणे गीतांजली शिर्के यांची नागरी समूह याच पदावर एक वर्षासाठी नियुक्ती झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.