गलवान संघर्षातील शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचं पत्र दिलं. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागातच त्यांनी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी या सध्या 8 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा यांच्यासमवेत दिल्लीत राहत आहेत. दुसरीकडे, हैदराबादमध्ये राहणाऱ्या संतोषच्या आईची इच्छा होती की मुलाची बदली कशीतरी हैदराबादमध्ये व्हावी. यापूर्वी तेलंगणा सरकारने कर्नल संतोष बाबूच्या कुटूंबाला पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

गेल्या महिन्यात भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. यामध्ये काही अधिकाऱ्यांचादेखील समावेश होता. त्या ठिकाणी सुरू असलेल्या तणावादरम्यान कर्नल संतोष बाबू हे चीनच्या जवानांशी चर्चा करण्यासाठी गेले होतं. परंतु त्यानंतर चीनच्या जवानांनी हल्ला केला. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणावात अधिक वाढ झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment