सातारा | रयत शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील लेखनिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त जागा अनुकंपा तत्वावर लवकरच भरण्यात येणार आहेत. संबंधित शाखेतील आकस्मित निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या वारसदारांनी संबंधित जागेवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे अर्ज केले आहेत. अनुकंपा तत्वावर नियुक्त्यासाठी आलेल्या एकूण अर्जातून तपशीलवार 223 अर्जांची यादी तयार केली आहे. तसेच रिक्त जागेनुसार सेवाज्येष्ठतेच्या निकषावर संबंधित वारसदाराला शासन नियमांच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार आहे.
संस्थेमध्ये लेखनिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण रिक्त असलेल्या पदांच्या 20% जागा अनुकंपा तत्वावर भरण्यात येतील. सेवाजेष्टतेचा निकषानुसार ही पदे भरली जातील. तसेच, येथूनपुढे जशा जागा रिक्त होतील त्याप्रमाणात राहिलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. जे उमेदवार सेवाज्येष्ठता यादीत आहेत पण त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची शिफारस नाही त्या उमेदवारांसाठी सेवाजेष्टतेनुसार जागा रिक्त ठेवण्यात येतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.