व्यवसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर आणि स्मार्ट प्रकल्पांना मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शुक्रवारी शहरात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत व्यवसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी देखील देण्यात आली. त्याचबरोबर रस्ते परिवर्तन, ऐतिहासिक ग्रेट आणि शहरासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) या प्रकल्पांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मेंटॉर पदी नियुक्त करण्यात आलेले बलदेवसिंह शुक्रवारी पहिल्यांदा औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालकांची बैठक घेतली. यावेळी स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी, मनपा प्रशासक यांच्यासोबत अन्य अधिकारी व संचालक उपस्थित होते.

यावेळी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी निविदा काढणे, डिजिटल डिस्प्लेवर जाहिरातींसाठी निविदा, 25 स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बसवणे, लाईट हाऊस, कौशल्य विकास केंद्रासाठी कम्युनिटी सेंटरचा विकास, क्रांती चौक उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण, मौलाना आझाद संशोधन केंद्राचे नूतनीकरण, संत एकनाथ रंगमंदिरातील स्टेजवर लाइटिंग, ट्रान्सफॉर्मेशन, सौर ऊर्जा प्रकल्प, सफारी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अधिग्रहण व बांधकाम छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियेला मंजुरी, संत तुकाराम नाट्यगृहाचे नूतनीकरण व व्यवसायिक मालमत्तांचा ती स्मार्ट वॉटर मीटर चे निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली.

Leave a Comment