पुणे प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५४ वे अधिवेशन येत्या २८ तारखेला होत असून त्याची जय्यत तयारी आतापासूनच सुरू आहे. मुकुंदनगरमधील सपंजो आश्रमाची जागा येथील स्थानिक रहिवाशांनी एक महिन्याकरिता मोफत उपलब्ध करून दिली आहे.
या जागेलाच विद्यार्थ्यांनी कार्यालय बनविले असून ऑनलाइन नोंदणीपासून पोश्टर,स्टिकर्स ,बैठक यांसाठी कार्यालयाचा पुरपूर वापर होतो आहे. विद्यार्थ्यांनी आजपासून अधिवेशनासाठी फँडिंग गोळा करण्यास सुरुवात केली असून विविध वस्त्या, चाळ, दुकाने आदी भागातून गोळा होणाऱ्या साहित्यातून अधिवेशन पार पाडण्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
दिनांक २८,२९, ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या ५४ व्या अधिवेशनासाठी पुण्यातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थी तयारीसाठी रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयातून सुमारे १५०० ते २००० विद्यार्थी येण्याची शक्यता आहे असे अ.भा.वि.प चे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री राघवेंद्र रिसालदार अनिल ठोबरे महानगर मंत्री पुणे यांनी सांगितले.