खुलताबाद पंचायत समितीचा मनमानी कारभार; 11:30 वाजले तरी कर्मचारी बेपत्ता

panchayat samiti
panchayat samiti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील पंचायत समिती 12 वाजले तरी निर्मनुष्य दिसत आहे. वेळ 10 वाजण्याची असताना आज 11:30 वाजेपर्यंत इकडे कोणताच अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही.

सध्या कोरोनाचा कहर देशभर सुरू आहे. मागील 2 महिन्यात लॉकडाऊनमध्ये लोकांचे अनेक कामे रखडली होती. अशात नागरिकांचे अनेक कामे पंचायत समितीमध्ये असतात. तसेच सध्या पेरणीची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांचे देखील अनेक कामे समितीत असतात. अस असताना देखील कार्यालय सकाळी 11.30 वाजेपर्यंत विना कर्मचारी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कार्यालयात सकाळी 10 ची वेळ असून देखील 11:30 वाजेपर्यंत आज कुणीही ऑफिस मध्ये हजर नव्हते. बडीओ प्रवीण सुरडकर हे देखील उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.