खचून चालणार नाही; काम तर करावंच लागणारंय – आरोग्य संचालिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यानंतर राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी खचून चालणार नाही, काम तर करावंच लागणारंय असे म्हणत त्यांनी संपूर्ण आरोग्य विभाग कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

कराड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात सध्या ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सहा कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालिका पाटील यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी मनोधैर्य खचू न देता काम करण्याची गरज आहे. जेवढ्या सुविधा आहेत त्याप्रमाणचे येथे रुग्ण अ‍ॅडमिट केले जात आहेत. रुग्णातयाील कर्मचार्‍याचे मनाधैर्य खचून चालणार नाही. सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. संपूर्ण आरोग्य विभाग त्यांच्या पाठीशी आहे, मदतीला आहे असे पाटील म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात एकूण ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील १० रुग्ण कराड मध्ये सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ५५ वर पोहोचली आहे.

Leave a Comment