ऑनलाईन शॉपिंगचे ॲडिक्शन वाईट; असे जाणून घ्या हे व्यसन आपल्याला तर लागले नाही ना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लोकांच्या आवडत्या छंदामध्ये ऑनलाइन शॉपिंग हाही एक छंद असतो. तर काही लोक हे शॉपिंगला नाही म्हणू शकत नाहीत. शेवटी शॉपिंग करणे हे चांगले आत्मविश्वासाने भरलेले आणि आनंदी करते. नेहमी आपल्या आवडत्या कलेक्शनमध्ये काही गोष्टी अजून ॲड करण्यासाठी सामान मिळते, यामुळे काही लोक गरजेचे नसतानाही खरेदी करत असतात. यासाठी आपणही अशाच शॉपिंगच्या कलेक्शनमध्ये अडकला असाल तर या गोष्टींमधून आपण जाणून घेऊ शकता की, आपण खरोखरच किती मोठ्या प्रमाणात अडकलो गेलो आहोत.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपण जास्त गुरफटलो गेलो आहोत का? हे जाणून घेण्यासाठी काही संकेत दिले गेले आहे. ते संकेत पुढील प्रमाणे आहेत. यानुसार आपण ठरवू शकता. सर्वप्रथम आपण काही केल्या ऑनलाइन शॉपिंग करणे बंद करू शकत नाही, ज्या वेळी आपल्या मनात विचार येईल की ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपल्याला आर्थिक नुकसान पोचवले आहे. सोबतच नाते आणि कामालाही नुकसान पोहोचवले आहे. ऑनलाइन शॉपिंगसाठी आपण जवळच्या व्यक्तींशी भांडत असतो. संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला दोन ते तीन वेळेपेक्षा जास्त वेळा ऑनलाइन शॉपिंग आठवते.

जेव्हा आपण ऑनलाईन खरेदी करतो त्यानंतर आपल्याला आनंदी वाटू लागते. तेव्हा बऱ्याच दिवसानंतर ऑनलाइन शॉपिंग केली नाही तर आपली चिडचिड होते. आपल्याला मोठ्या प्रमाणात राग येतो. बहुतांशी वेळा आपण अशा वस्तू खरेदी करतो, ज्या आपल्याला एकावेळी पेक्षा जास्त लागणाऱ्या नसतात. शॉपिंग साइट्स पण गरज नसताना छंद म्हणून आपण उघडून पाहत बसतो. तेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंगचे ॲडीक्टेड झालो आहोत, असा त्यातून समज निष्कर्ष निघतो. त्यामुळे लवकरच सावध होऊन आपण या मधून बाहेर पडले पाहिजे. व आपले होणारे नुकसान टाकले पाहिजे.

Leave a Comment