हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलेली जपानची प्रसिद्ध टेनिस खेळाडू नाओमी ओसाका हिने बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटच्या अपघाती मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. या पत्रामध्ये तिने कोबेचं आपल्या जीवनात काय स्थान होतं हे वर्णन केलं आहे. संपूर्ण जगभरातून कोबे आणि त्याच्या मुलीच्या अपघाती मृत्युवरून हळहळ व्यक्त केली जात असताना ओसाकाने मला हे स्वीकारणं कठीण जात असल्याचं म्हणत ट्विटरवरून हे पत्र पोस्ट केलं आहे.
एका महान खेळाडूच्या आकस्मिक अपघातानंतर एका खेळाडूनेच लिहिलेलं भावनिक पत्र..
प्रिय कोबे (मोठ्या भावा),
मला खरंच समजत नाहीये म्हणून मी हे पत्र लिहतेय. तू कायम आहे तसा राहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तू जिथे होतास तिथून लोकांना प्रेरणा देत राहिलास त्याबद्दल धन्यवाद. तुला कल्पना नसेल की किती लोकांच्या हृदयावर तू अधिराज्य गाजवलायस. तू आयुष्यभर इतका नम्र राहिलास की स्वतःला मोठं समजावं अशी अपेक्षाही तू बाळगली नाहीस. माझ्या आयुष्यातील खडतर प्रवासानंतर तू कायम ‘तू ठीक आहेस ना?’ असा संदेश पाठवत राहिलास हे मी कधीच विसरु शकणार नाही. माझं डोकं खाणारी आणि मला अडचणीत आणणारी किती लोकं माझ्या आयुष्यात होती हे तुला माहीतच होतं. फार कमी वेळातच तू मला चांगलं कसं जगायचं हे शिकवलंस. आणि मी ही तुला लवकर ओळखू शकले याचा मला आनंदच आहे. तू माझ्यासाठी होतास याबद्दल आणखी काय सांगू. तू नेहमीच माझ्यासाठी मोठा भाऊ, मार्गदर्शक, प्रेरणास्थान राहिलास. तुझ्यावर खूप प्रेम करणारी
– तुझीच नाओमी ओसाका
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
रजनीकांत बियर ग्रील्सच्या मॅन vs वाइल्ड शोमध्ये दिसणार! बांदीपूर जंगलात होणार चित्रीकरण
विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!
महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..