अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्जेंटिनाचे जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना (Diego Maradona ) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅरेडोना यांना राहत्या घरी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांची ब्रेन सर्जरी झाली होती. यावेळी त्यांच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी हटवण्यात आल्या होत्या.

दिएगो मॅरेडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते. सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पेले यांच्यासारखेच दिएगो मॅरेडोना हे सुद्धा 10 क्रमांकाची जर्सी घालायचे. यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलविश्वात पदार्पण केले. यानंतर अल्पावधीतच त्यांची गणना जगातील लोकप्रिय फुटबॉलपटूंमध्ये होऊ लागली होती.

हँड ऑफ गॉड’ Hand of god म्हणूनही मॅराडोना यांची ओळख होती. त्यांनी अर्जेंटिनाच्या संघाकडून 34 गोल करत तब्बल 91 गोल करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं. अखंड फुटबॉल कारकिर्दीमध्ये त्यांनी 259 गोल केले आहेत. हे गोल त्यांनी क्लब आणि इतर संघांकडून खेळताना केले आहेत.

मॅराडोना यांच्या निधनाचं वृत्त कळतातच सर्वच स्तरांतून दु:ख व्यक्त करण्यात आलं. बहुविध क्षेत्रातील दिग्गज आणि जगभरातील फुटबॉल प्रेमींनी या महान खेळाडूला श्रद्धांजली वाहिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like