धक्कादायक !! मालकासोबत वाद आणि चालकाने केला गोळीबार ; झाडल्या तब्बल तीन गोळ्या

तरुण गंभीर जखमी; एकास अटक

औरंगाबाद । रस्त्यात भांगर ने भरलेला ट्रक उभा केल्याने मालकासोबत तरुणांचा वाद झाला ते वाद पाहताच ट्रक चालकाने स्वताजवळील गावठी कट्टा काढत तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी तरुणांच्या मांडीत लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना बुडडीलाईन भागात रात्री घडली या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

शेख महमूद उर्फ राजाभाई अहेमद जमील असे अटक करण्यात आलेल्या भंगार व्यावसायिकांचे नाव आहे.तर शेख अब्दुल जब्बार शेख अब्दुल सत्तार असे गोळी लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्री 10 वाजेच्या सुमारास जखमी जब्बार चा भाऊ रजाक ने रस्त्यात भांगर ची ट्रक लावल्यावरून राजभाई ला जाब विचारला दरम्यान दोघात वाद निर्माण झाला.हा वाद ट्रक चालक अक्रम ने पहिला व त्या जवळील गावठी बनावटीच्या रिव्हलव्हर ने फायरिंग केली.या मध्ये रजाक बचावला मात्र त्याचा भाऊ जब्बार ला मांडीत गोळी लागली. घटने नंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते पोलिसांनी त्यातील राजाभाई ला अटक केली असून गोळीबार करणारा मुख्य आरोपी अक्रम हा अद्याप ही फरार असून या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like