किरीट सोमय्यांच्या रडारवर अर्जुन खोतकर ! 100 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झाल आहे. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, शरद पवार म्हणाले होते अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. पण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जेलमध्ये टाकल. ही धमकी कुणाला देता, धमक्यांची सिरीज सुरु करा. 23 जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय. अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे. मुळे आणि तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

पवार, ठाकरेंचे सहकारीच असे घोटाळे करु शकतात –
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारीच असे घोटाळे करु शकतात. मुळे, तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करुन हा कारखान्याचा घोटाळा केलाय. कारखान्याची 100 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अर्जुन खोतकर यांची 100 कोटीचा कारखाना आणि 1 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचं सोमय्या म्हणाले. तसंच शरद पवार यांचा ईडी अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, हायकोर्ट आणि भाजपला धमकी देण्याचा उद्देश होता, असा आरोपही सोमय्या यांनी केलाय.

शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही –
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट केलंय. तर शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवायचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

 

Leave a Comment