हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवारी क्रीडा मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. मोहम्मद शमीबरोबर इतर 26 खेळाडू देखील अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याची माहिती आज क्रीडा मंत्रालयाने दिली आहे.
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये शमीने दमदार गोलंदाजी केल्याची पाहिला मिळाली. ज्यामुळे त्याचे संपूर्ण देशात कौतुक करण्यात आले. याच कामगिरीची दखल घेत क्रीडा मंत्रालयाला अर्जुन पुरस्कारासाठी शमीच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत सकारात्मकता दाखवत क्रीडा मंत्रालयाने BCCI ची विनंती मान्य केली आहे. त्यानुसार, आता यंदा अर्जुन पुरस्काराचा मानकरी मोहम्मद शमी ठरला आहे. क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णय शमीचे देशभरात विशेष कौतुक करण्यात येत आहे.
शमीबरोबर अर्जुन पुरस्काराचे मानकरी कोण ठरले?
येत्या 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराचे 26 खेळाडू मानकरी ठरली आहेत. यामध्ये अजय रेड्डी, ओजस प्रवीण देवताले, अदिति गोपीचंद स्वामी, शीतल देवी, पारुल चौधरी, मुरली श्रीशंकर, मोहम्मद हुसामुद्दीन, आर वैशाली, दिव्यकृती सिंह आणि अनूष अग्रवाल, दीक्षा डागर, कृष्ण बहादुर पाठक, सुशीला चानू, पिंकी, अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.