कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत आणखी वाढ ‘हा’ परवाना केला रद्द

Sushil Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : ऑलम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. आधीच पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला अटक केली आहे. आता त्याही पुढे जाऊन सुशीलचा शस्त्रास्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे. लायसन्स विभागाने परवाना रद्द करण्याची ही प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केल्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती.

कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून सुशीलकुमार फरार होता. सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याला अक्षरश: रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले होते त्यानंतर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ऑलम्पिक पुरस्कार विजेता सुशीलकुमार हा उत्तर रेल्वेचा वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक होता. 2015 पासून तो प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये कार्यरत होता. त्याला शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र कुस्तीपटू सागर धनखर याच्या हत्या प्रकरणानंतर मात्र सुशिल्कुमार चांगलाच गोत्यात आला आहे.

37 वर्षीय सुशील कुमारनं 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर 2008च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये कास्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारनं जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्या नंतर ऑलिंपिकमध्ये कुस्ती प्रकारात भारताला पटकावलं दुसरा पदक पदक. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने देखील गौरवण्यात आलं होतं. मात्र सध्या सुशील कुमारचे दिवस पालटले आहेत. सागर धनगर हत्या प्रकरणानंतर आता सुशील कुमारला उत्तर रेल्वे सेवेतून निलंबित केला आहे. दुसरीकडे सुशीलचा शस्त्र परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे.