सांगली : अपघातात लष्करी जवानांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाघवाडी फाटा ते रेठरेधरण मार्गावरील जांभूळवाडी फाटयाच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून जितेंद्र धनवडे या जवानाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाव्हीने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.

ओझर्डे येथील जितेंद्र धनवडे हे सात वर्षांपासून सैन्यात नोकरीस आहे. १० दिवसांपूर्वी सुट्टी काढून ते घरी आले होते. ३ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास दुचाकी वरून जितेंद्र धनवडे हे वाघवाडी फाटा येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. वाघवाडी फाटा येथून रेठरे धरणकडे परतत असताना जितेंद्र धनवडे यांच्या दुचाकीला वाघवाडीकडे जाणार्‍या ट्रॅक्टरने जांभूळवाडी फाटयाच्या वळणावर धडक दिली. या अपघातात टॅ्रक्टर ट्रॉलीचे पाठीमागील चाक दुचाकीस्वार जितेंद्र धनवडे याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याची कवटी फुटून तो जागीच मयत झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉली जागेवर ठेवून टॅ्रक्टर चालक राम माळी याने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती जितेंद्र याचा भाऊ राहुल धनवडे यांना फोनवरून मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला होता. तर मोटरसायकलचे ८ हजाराचे नुकसान झाले.

Leave a Comment