… मग उद्धव ठाकरेंनाही अटक करणार का? सुप्रीम कोर्टात हरिश साळवेंची अर्णव गोस्वामींच्या बाजूने जोरदार बॅटिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुनावणी होत आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीत वकील हरिश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. मग आता पोलीस उद्धव ठाकरे यांना अटक करणार का?असा सवाल अर्णव गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी उपस्थित केला. (Arnab goswami bail plea hearing in SC) अर्णव गोस्वामी यांना ज्याप्रकारे अटक झाली, ती अटक करण्याची पद्धत आहे का? अशाप्रकारे अटक करायला अर्णव गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल हरिश साळवे यांनी उपस्थित केला.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण सदोष मनुष्यवधाचा खटला नाही. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण मे 2020 पर्यंत शांत होते. त्यानंतर 21 एप्रिलला अर्णव गोस्वामी यांनी रिपब्लिक चॅनेलवरुन पालघरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली. यानंतर 26 एप्रिलला अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी राज्य सरकारला तपास सुरु करण्यासंदर्भात पत्र लिहले. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे हरिश साळवे यांनी म्हटले. तसेच अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करून आत्महत्या केल्याचेही हरिश साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

आजच्या सुनावणीवर बार कौन्सिलचा आक्षेप
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

 

 

Leave a Comment