Sunday, May 28, 2023

अर्णव गोस्वामीचे ‘ते’ चॅट व्हायरल; PMO ला भेटणार असल्याची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व्यक्तिमत्व म्हणून अर्णव गोस्वामी यांची ओळख आता संपूर्ण भारताला झाली आहे. त्यांच्या वर अनेक मीम देखील सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भडक आणि वादातीत वक्तव्यांसोबत आक्रमक स्वभावामुळे ते सोशल मीडियावर अर्णव गोस्वामी चांगलेच गाजत आहेत.  त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यांचे ब्रॉडकास्ट ऑडिओ रिसर्च काउन्सिल चे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांच्यासोबतचे चॅट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोस्वामी चर्चेत आले आहेत.

या चॅट मधील स्क्रिनशॉट आता सोशल मीडियावर फिरत असून अनेकजण अर्णव गोस्वामी विरोधात भडक पोस्ट करत आहेत. तसेच त्यांच्या राजकीय संबंधाविषयी देखील बोलले जात आहे. एका चॅट मध्ये ते पीएमओ ना भेटणार असल्याचे पार्थो दास गुप्ता याना सांगत आहेत. पार्थो दास गुप्ता हे एका गोपनीय पत्राबद्दल बोलत आहेत. गोस्वामी पार्थो दास गुप्ता यांना रजत शर्मा आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यामध्ये आडकाठी आणणार नाहीत असे आश्वासन ही देत आहेत.

https://twitter.com/abhijeet_dipke/status/1349962790002327554

या चॅट च्या प्रसिद्धीनंतर अर्णव गोस्वामी यांचे व्यक्तिमत्व आणखीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. एकूणच माध्यमाबद्दल देखील बोलले जात आहे. ट्विटर वर अनेकांनी या चॅट मधील वेगवेगळे भाग हायलाईट करून शेअर केले आहेत. अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. तसेच अशा माणसाला मोठा तुरुंगवास झाला पाहिजे असेही काहींचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.