कोरोना संदर्भात रशियन सरकारवर टीका करणारे तीन डॉक्टर पडले रहस्यमय अपघातांना बळी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये अचानक कोरोना विषाणूची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांची अवस्था आणखी बिकट झालेली आहे.इथे रूग्णांची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. यानिमित्ताने डॉक्टर सतत सरकारवर टीका करीत असून या टीकेच्या बदल्यात त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियातील ३ डॉक्टर हे रुग्णालयाच्या खिडकीतून खाली पडले आहेत, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांबरोबर घडलेल्या या रहस्यमय घटनेने तेथील व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शनिवारी वरोनेझ येथील रुग्णालयाच्या खिडकीतून पडल्यानंतर डॉक्टर अलेक्झांडर शुलेपोव्ह यांची प्रकृती गंभीर झाली आहे.स्थानिक राज्य टेलिव्हिजनने सांगितले की ते नोव्होसमॅकया रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडले आहे, जिथे ते काम करीत होते आणि कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे उपचार घेत होते.

२२ एप्रिल रोजी शूलेपोव्ह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्याने आणि त्याचा सहकारी अलेक्झांडर कोश्याकिन यांनी एक व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला ज्यामध्ये ते म्हणाले होते की कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांना काम करण्यास भाग पाडले गेले आहे.

त्याचप्रमाणे १ मे रोजी, क्रिस्नोयार्स्क शहरातील सायबेरियन शहरातील रुग्णालयाचे कार्यवाहक मुख्य चिकित्सक एलेना नेपोन्माश्या यांचा प्रादेशिक आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान कथितपणे खिडकीतून खाली पडून मृत्यू झाला आहे.२४ एप्रिल रोजी रशियाच्या स्टार सिटीमधील आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या प्रमुख नताल्या लेबेडेवा यांचेही रुग्णालयात पडल्यानंतर निधन झाले.

दरम्यान, रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली. यासह, देशात प्रथमच कोविड -१९ च्या रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे ही मॉस्कोमधून समोर आलेली आहेत. यामुळे मॉस्कोच्या वैद्यकीय सुविधा बिघडू शकतात त्यामुळे चिंता वाढली आहे. उल्लेखनीय आहे की रशियामध्ये कोरोना विषाणूची नोंद १,४४,००० लोकांना झाली आहे तर १,४२० लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like