महाराष्ट्र लुटणाऱ्या बावनकुळेंना अटक करा; संजय राऊत यांची मागणी

0
1
raut and bawankule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरुवारी मुंबईमध्ये (Mumbai) शिवसेनेचा (Shivsena) भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्येच आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही. मोदी आणि शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत.” अशी टीका राऊत यांनी शिंदेंवर केली आहे.

एकनाथ शिंदेंवर टीका करत राऊत म्हणाले की, “शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाही की शिवसेनाप्रमुखांचे वारसदारही नाहीत. शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीताने पळून गेले आहेत. शिंदेंच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस. काय म्हणतो. आमचं बघू ना आमची मनगटं, तुमच्यावर मनगटं चावण्याची वेळ येणार आहे.”

त्याचबरोबर, “आमच्या दंडात दम नाही म्हणता तुमची चड्डी सांभाळा. तुमच्या चड्डीचा नाडा दिल्लीवाल्यांच्या हाती आहे. ते कधीही खेचतील आणि नागडे व्हाल. आम्ही लाचार नाही. आम्ही सत्तेसाठी आलेलो नाही. आमचा पक्ष आहे. तुमच्यासारखे लाचार येतात आणि निघून जातात. मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरे घालण्यासारखं आहेत. तुमची सत्ता आणि प्रतिष्ठा कायम राहणार नाही. तुम्ही तात्पुरते आहात.” अशा शब्दात राऊत यांनी शिंदेंवर घणाघाती प्रहार केला.

या माणसाला अटक करा…

इतकेच नव्हे तर, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्यावर देखील राऊत यांनी टीकास्त्र सोडले. “बावनकुळे तेच गृहस्थ आहेत ना ज्यांनी 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लूटला. ED आणि CBI कुठे आहे. या माणसाला अटक केली पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना महसूलमंत्री करून गुन्हा केला. बावनकुळे तुम्ही 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला. आम्हाला द्याल का. कोण बावनकुळे, ते तर रावणकुळे आहेत” अशी मागणी राऊत यांनी केली.