मुंबई । पाकिस्तानमधील फोटोग्राफर जिया अली या तरुणीने २०१६ मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका चहावाल्याचा फोटो शेअर केला होता. निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चहावाला बराच लोकप्रिय झाला होता. तेव्हा निळ्या डोळ्यांच्या चायवाल्यांने लाखो तरुणींना घायाळ केलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पाकिस्तानी चहावाला’ या नावानं रातोरात स्टार झालेला अरशद खान तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
त्याला कारण देखील तसचं आहे. अरशदने इस्लामाबादमध्ये स्वतःच्या मालकीचा कॅफे सुरु केला आहे. इस्लामाबादच्या रस्त्यांवर चाहा विकणारा सामान्य मुलगा आता एका कॅफेचा मालक झाला आहे. अरशदने इस्लाबादमध्ये आपल्या चहा कॅफेचं उद्धाटन केलं आहे. कॅफे चायवाला रूफ टॉप (Cafe Chaiwala Roof Top) असं नाव त्याने त्याच्या कॅफेला दिलं आहे.
سوشل میڈیا سے شہرت پا کر ٹی وی ڈرامے میں کام کرنے والے ارشد خان المعروف 'چائے والا' نے اسلام آباد میں ماڈرن طرز کا چائے کا ڈھابہ کھول لیا ہے جہاں وہ خود بھی خاص مہمانوں کے لیے چائے بنائیں گے۔ دیکھیے حارث خالد کی اس ڈیجیٹل رپورٹ میں#Pakistan #Chaiwala #ArshadKhan pic.twitter.com/DomhlfUfAJ
— Urdu News (@UrduNewsCom) October 3, 2020
पाकिस्तानमधील उर्दू न्यूजने या बातमीला दुजोरा दिला आहे. ‘अनेक लोकांनी मला सांगितलं की कॅफेचं नाव अरशद खान असं सांगितलं पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण चायवाला म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे.’ अशी माहिती त्याने उर्दू न्यूजला दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”