परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ .चे कलम १४४ ची मुदत रविवार दि. १७ मे पर्यंत वाढविली असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले होते. राज्य शासनाने दि. २ मे रोजीच्या आदेशाव्दारे दि . १७ मे पर्यंत लॉक डाऊन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाने दि . २२ मार्च व त्यानंतर वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा कालावधी दि. १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.
यामध्ये आस्थापनांना व अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. सदरील आस्थापना दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु राहतील. ज्या आस्थापना व दुकानांना सूट दिलेली नाही ती बंद राहतील. तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश व निर्देश या कालावधीत संपूर्ण परभणी जिल्ह्यात अंमलात राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.