कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड पालीच्या खंडोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असून मोजक्या 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाचे यात्रेचे धार्मिक विधी होणार आहेत. पाली गावात 144 कलम लागू करण्यात आले असून बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आज पाली गावात 10 अधिकारी आणि 69 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील पाली येथे आज खंडोबा देवाच्या यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आज शनिवारी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी गावात पाहणी केली. तसेच पाली गावात येणाऱ्या मुख्य मार्गावरील काशिळ, तारळे, इंदोली यासह प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी पाली गावात येणाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाली गावात खंडोबा देवाची यात्रा रद्द झाल्याने गावात शुकशुकाट जाणवत आहे. दरवर्षी येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडत असते. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने पोलिस बंदोबस्तात मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पार पडत आहे. श्री क्षेत्र खंडोबा पाल यात्रा सोहळा आज दि. 15/01/ 2022 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून लाईव्ह दर्शनासाठी युट्यूब व फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/channel/UC_tPRAlCnilRZFu0yV0mhYw