पुणे प्रतिनिधी | अक्षय कोटजावळे
यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणते या वर्षी पहिल्यांदा अध्यक्ष पदासाठी निवडणुका न होता एक मताने अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली आहे.
हे संमेलन यवतमाळ येथे ११, १२, १३ जानेवारी २०१९ मध्ये पार पडणार आहे. संमेलनाध्यक्ष पद भूषविणाऱ्या अरुणा ढेरे हया पाचव्या महिला साहित्यिक आहेत.