नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. परंतू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने आपण आज वाढदिवस साजरा करणार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर दिल्ली एम्स मध्ये उपचार करण्यात येत आहेत.वाचपेयीं सर्वसाठी आदरणीय व्यक्ती आहेत म्हणूनच त्यांच्या बद्दल सर्व स्थरातून सहानभूती व्यक्त होत आहे.केजरीवाल यांनी ही त्यांच्या आजारपणाच्या दुःखातूनच वाढदिवस साजरा नकरण्याचा निर्णय केला आहे.




