हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या अस्वस्थ प्रकृतीचा आणि वैद्यकीय चाचणीचा दाखला देत अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची विनंती केली होती. याचं याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र या सुनावणी दरम्यान कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला नाही.
महत्वाचे म्हणजे, आजच्या सुनावणीमध्ये केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीला ईडीने विरोध केला. या सुनावणीवेळी ईडीने आरोप लावला की, अरविंद केजरीवाल आरोग्याबाबत खोटी विधाने करत आहेत. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने अंतरिम जामिनावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळेच केजरीवाल यांना 2 जून रोजी शरण जावे लागणार आहे.
दरम्यान, मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने 21 मार्चला अटक केली होती. या अटकेनंतर केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांच्या कोठडीत पुन्हा 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. पुढे निवडणुकीच्या काळात कोर्टाने प्रचारासाठी केजरीवाल यांची 21 दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. याचं जामिनाची मुदत 2 रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा शरण जावे लागणार आहे.