अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा जागेवर आघाडीवर, भाजप उमेदवार पिछाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली जागेवर आघाडी घेतली आहे. सुरु असलेल्या मतमोजणीच्या परिणामानुसार भाजप नेते सुनील कुमार यादव दुसर्‍या क्रमांकावर आहेत. नवी दिल्ली विधानसभेची जागा दिल्लीच्या मध्यवर्ती भागांत येते तसेच एक मोठा भाग नवी दिल्ली लोकसभा मतदार संघात येतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवारी ८ फेब्रुवारीला या जागेवर मतदान पार पडले होते.

2013 आणि 2015 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीची जागा जिंकली होती.  2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी ही जिंकली होती.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील एकूण मतदारांची संख्या 1,46,92,136 इतकी असून त्यांनी 2,689 ठिकाणी स्थापन केलेल्या एकूण 13,750 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला आहे. राष्ट्रीय राजधानीत महिला मतदारांची संख्या, 66,35,635.असून पुरुष मतदारांची संख्या 80,55,686 इतकी आहे. यासोबतच दिल्लीमध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या 815 असून एनआरआय मतदारांची संख्या 489 इतकी आहे. राष्ट्रीय राजधानीत सेवा मतदारांची (Service Voters) एकूण संख्या 11,556 आहे, त्यापैकी 9,820 पुरुष मतदार आहेत. या व्यतिरिक्त दिल्लीतील 55,823 मतदार दिव्यांग प्रकारात मोडतात.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment