व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीप्रमाणे गोव्यातही मोफत वीज देणार – अरविंद केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध राजकीय पक्षातील नेत्याकडून दौरे केले जात आहेत. यावेळी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार आहे. दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गोव्यासाठी व्हिजन मांडल. “आमचे सरकार गोव्यात आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातही आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलून वीजही मोफत देणार असे आहोत,”आश्वासन केजरीवाल यांनी दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यात जात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही दिल्लीत सरकार स्थापन केले आहार. या ठिकाणी तेथील जनतेला आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलून वीजही मोफत दिली आहे. आम्ही गोव्याच्या बाबतीत एक व्हिजन घेऊन आलो आहे. या ठिकाणी सरकार आल्यास बेरोजगारांना महिना 3 हजार दिले जाणार आहेत. तसेच सरकार झाल्यावर 6 महिन्यात मायनिंग सुरु केली जाईल. सहा महिन्याच्या आत जमीन हक्क मिळतील. तसेच दिल्लीप्रमाणे गोव्यामध्ये शाळा, शिक्षण व्यवस्था बदलणार आहोत.

गोव्यात दिल्लीत ज्या प्रकारे सरकारच्यावतीने सुविधा दिल्या आहेत. त्याप्रकारे सुविधा दिल्या जातील. विशेष करून आम्ही गोव्यात मोफत स्वरूपाची वीज देऊ. तसेच या ठिकाणाला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेऊ. या ठिकाणी यावेळच्या निवडणुकीत जर आपचे सरकार आल्यास पुढील पाच वर्षात एका कुटुंबला 10 लाख रुपयांचा फायदा होईल. त्यामुळे येथील लोकांनी आता कशा प्रकारे फायदा घ्यायचा हे ठरवावे, असे केजरीवाल यांनी म्हंटले आहे.