डिसेंबरमध्ये तब्बल 45 लाख SIP खाती बंद; गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

0
1
SIP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शेअर बाजारातील सततच्या चढ-उतारांमुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच म्युच्युअल फंडांच्या प्रणालीगतच्या गुंतवणुकी (SIP) बाबत देखील असमंजसता वाढत चालली आहे. महत्वाचे म्हणजे, अशातच डिसेंबरमध्ये तब्बल 45 लाख SIP खाती बंद करण्यात आली आहेत.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, यापूर्वी मे महिन्यात 44 लाख खाती बंद झाली होती. मात्र डिसेंबरमध्ये हा आकडा नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. याशिवाय, नवीन SIP खाती उघडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. कारण डिसेंबरमध्ये फक्त नऊ लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत. जे मागील सात महिन्यांतील सर्वात कमी खाती आहेत.

SIP बंद करण्याचे ऩेमके कारण काय?

दुसऱ्या बाजूला शेअर बाजाराच्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे अनेकजण SIP बंद करण्याचा निर्णय घेत आहेत. वित्तीय तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांमध्ये बाजारातील घडामोडी असे निर्णय घेतले जात आहेत. यामुळे दोन्ही बाजूंनी मोठा फटका बसत आहे.

SIP गुंतवणूकदार बहुतेक वेळा फंड निवडताना कंपनीच्या अलिकडील परफॉर्मन्सवर भर देतात. मात्र, बाजारातील स्थिती किंवा फंड व्यवस्थापनातील बदलांमुळे परतावा कमी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फक्त अल्पकालीन परताव्यावर आधारित निर्णय घेण्याऐवजी गुंतवणूकदारांनी विविध घटकांचा विचार करावा, असा सल्ला वित्तीय सल्लागारांकडून देण्यात येत आहे.