औरंगाबाद | एमजीएम समोरील कैलासनगरकडे जाणारा मुख्य रस्ता अँपल रुग्णालयाने फोडण्याचा प्रकार गुरुवारी मनपा शासनाच्या निर्दनाश आला. शहरात एकीकडे सिमेंटचे रस्ते तयार होत आहेत. त्याची काळजी न घेताच बेजबाबदारपणे रस्ते फोडण्यात आले. त्यामुळे मनपाकडून रस्ते फोडणारा जेसीबी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
संबंधित अधिकारी व अँपल रुग्णालयाची चौकशी करून दोषी आढळ्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. मनपा प्रशासक गुरुवारी कॅनॉट प्लेस भागात पाहणी करून एमजीएम हॉस्पिटल मार्गे जात असताना त्यावेळी एमजीएम ते कैलासनगर रस्त्यावर इंटरनॅशनल हॉस्पिटल शेजारील अँपल रुग्णयाने ड्रेनेजच्या कामासाठी नव्याबे तयार केलेला रस्ता फोडल्याचे त्याच्या लक्षात आले.
यावेळी या रस्त्याच्या तोडफोडीची पाहणी करून मनपा प्रशासकांनी जेसीबी जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानंतर महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने जेसीबी जप्त केला आहे. या वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे उपस्थित होते.