बोर्डातील कचरा उचलत नाहीत म्हणून, एमआयएम कार्यकर्त्यांनी कार्यालयाला ठोकले टाळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरामध्ये कचऱ्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे डेंग्यू, साथीच्या रोगांचा उद्रेक वाढत आहेत. वार्डातील कचरा उचलला जात नाही म्हणून, नगरसेवक नासीर सिद्दिकी यांनी आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका येथील झोन-3 मधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले.

महानगरपालिका मुद्दाम झोपडपट्टी असलेल्या भागाकडे कानाडोळा करत आहे. झोन-3 मध्ये रेडी नावाची एक कंपनी कचऱ्याचे काम पाहते. परंतु कंपनीकडून कोणताही कचरा वेळेवर उचलला जात नाही. जर 24 तासांच्या आत वार्डमधील कचरा येत्या आत महानगरपालिकेने उचलला नाही तर आम्ही तोच कचरा महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये टाकू असा इशारा एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगरसेवक नासीर सिद्दिकी, शेख आहेमंद, सलीम सहारा, साईद फारुकी, वाजीद जागीरदार आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment