Wednesday, March 29, 2023

बायको नांदायला येत नाही म्हणून सासूच्या डोक्यात जाते घालून केले ठार स्वतःही केली आत्महत्या

- Advertisement -

नांदेड | पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने सासुच्या डोक्यात जाते घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री भावसारनगर येथे घडली. भीतीपोटी जावयानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पती-पत्नीचे भांडणावरून सासूला जीव गमवावा लागला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मालिनी विजयकुमार बाहेकर या आपल्या शिक्षक मुलासोबत भावसारनगर येथे राहत होत्या त्यांची मुलगी मोहिनी तिचा श्रीकांत शंकरराव पाटेवाड याच्याशी सहा वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. मोहिनी खासगी बँकेत नोकरीला होती. आणि श्रीकांत एका होस्टेलवर गार्ड म्हणून काम करत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली व तो बेरोजगार झाला. त्यामुळे दोघांचे वादा वाद सुरू झाले. आणि मोहिनी माहेरी निघून गेली.

- Advertisement -

तिच्यापाठोपाठ श्रीकांत ही तिथे गेला आणि सासरी चल असा आग्रह करू लागला परंतु मोहिनीने यायला नकार दिल्यास त्याचा राग अनावर झाला. आणि नशेच्या भरात त्याने हे कृत्य केले. रविवारी रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान मालिनी या घरात एकट्या होत्या त्या दरम्यान श्रीकांतने त्यांच्या डोक्यात जात्याचा दगड घातला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मालिनीला रक्तामध्ये पाहून श्रीकांत खूप घाबरला आणि त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.