असदुद्दीन ओवेसींच्या कार्यक्रमात मुलीच्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवरुन ठिकठिकाणी गदारोळ सुरु आहे. कायद्याच्या समर्थनाइतकेच कायद्याच्या विरोधातील लोकही पहायला मिळत आहेत. अशातच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगलोर येथील सभेत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं. ओवेसी यांचं भाषण चालू असतानाच अमूल्या नावाची ही मुलगी स्टेजवर आली आणि बोलू लागली. यावेळी तिला पोलिसांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिने आपलं म्हणणं लोकांना सांगण्याचा आटापिटा सुरुच ठेवला. यावेळी स्टेजवरील वातावरण तंग झालं होतं. ओवेसी यांनाही काय करावं हे क्षणभर सुचेनासं झालं. पाहुयात नक्की काय गोंधळ उडाला. दरम्यान या घटनेनंतर मुलीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या मुलीचा कार्यक्रमाशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ओवेसी यांनी दिलं आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment