हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य सरकारने महिला मतदारांवर विशेष लक्ष दिलेले आहे. सरकार राज्यामध्ये अनेक नवनवीन योजना राबवत आहे. त्यामध्ये महिलांना ते केंद्रस्थानी ठेवत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आता अशातच आता अशा सेविकांना देखील निवडणुकीपूर्वी एक भेट दिलेली आहे. ती म्हणजे आता मोबाईल सोबत त्यांच्या रिचार्जची ही व्यवस्था सरकारकडून केली जाणार आहे. आणि यासंबंधीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार खनिज विकास निधीमधून वर्षभर आशा सेविकांना रिचार्ज रक्कम दिली जाणार आहे. यासोबतच मानधन देखील वाढवण्यासंबंधात जीआर निघालेला आहे. परंतु त्याबाबतचे पैसे अजून आलेले नाहीत. अशी तक्रार लक्षात घेता आता या महिन्यात ते सर्व पैसे जमा होतील, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिलेली आहे.
उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांसाठी मोबाईल वितरण तसेच पारशिवनी तालुक्यातील घाट पेंढरी आणि कटोल तालुक्यातील शिल्पा आणि भोरगड येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये आशा सेविकांना मोबाईल आणि टॅब दिलेले आहेत. ते मिळाल्याने त्यांचे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काम देखील गतिमान होणार आहे. आणि सरकारी आरोग्य सुविधांचा लाभ आता कमीत कमी वेळेत नागरिकांना देखील मिळणार आहेत. तसेच तीन नवीन आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू झाल्याने आता नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेचा विस्तार झालेला आहे.