हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या एका महिन्यापासूनच पंढरपुरात आषाढी वारीची (Ashadi Wari) जल्लत तयारी सुरू झाली आहे. याच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. याचं बैठकीमध्ये येत्या 17 जुलै रोजी आषाढी वारी सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह 7 जुलैपासून भाविकांसाठी पांडुरंगाचे दर्शन 24 तासांसाठी खुले हे देखील सांगण्यात आले. म्हणजेच 7 जुलैपासून भाविकांना 24 तासात कधीही पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पार पडलेल्या या बैठकीत पालखी प्रमुखांच्या शासकीय पूजेत बसण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे पालखी प्रमुखांना महापूजेत बसण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जात आहे. आता या बैठकीनंतर लवकरच राज्याच्या मु्ख्यमंत्र्यांना विठुरायाच्या पूजेचे निमंत्रण दिले जाणार आहे. यासह आषाढी वारीसाठीची पुढील कामे ही उरकण्यात येतील.
दरम्यान, विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठुरायाचे दर्शन 24 तास खुले केल्यामुळे भाविकांच्या आनंदात आणखीन वाढ झाली आहे. कारण की, अनेकवेळा आषाढी वारीत असलेल्या गर्दीमुळे आणि मर्यादित वेळेमुळे अनेक भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता येत नाही. ज्यामुळे त्यांची मोठी निराशा होते. परंतु आता हीच बाब लक्षात घेऊन ट्रस्टने भाविकांसाठी विठुरायाचे दर्शन चोवीस तास खुले केले आहे.