टँकरचे पाणी पीत असताना वारकऱ्यांना टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, गाडीचालक ताब्यात

Pandharpur Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारीला गेलेल्या वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. टँकरचे पाणी पीत असताना पाठीमागून येऊन पिकअप टेम्पोने वारकऱ्यांना जोराची धडक दिली आहे. या अपघातात 4 विद्यार्थी वारकरी जखमी झाले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे 4:00 ते 4:30 दरम्यान झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, वाल्हे … Read more

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

kartiki ekadashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंढरपुरात कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, यावर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहपत्नी अमृता फडणवीस यांना मिळाला आहे. त्यामुळे आज पहाटे फडणवीस दांपत्याने स्वहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. तसेच, मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील … Read more

पंढरपूरमधून मराठवाड्यात जाणारी बससेवा पूर्णपणे बंद!! हिंसक आंदोलनामुळे निर्णय

Pandharpur to Marathwada Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचे आंदोलन सुरु असेल तर सर्व प्रथम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सर्वात आधी निशाण्यावर  असतात. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु असून मराठावाड्यातील काही जिल्ह्यात या आंदोलनामुळे हिंसक स्वरूप मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूरमधून मराठवाड्यात जाणारी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील अनेक बस आगार बंद  : … Read more

फलटण ते पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार? रणजितसिंह निंबाळकरांनी दिली महत्वाची माहिती

Pandharpur Phaltan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत फलटण ते पंढरपूर (Pandharpur Phaltan Railway) असा रेल्वेमार्ग महारेल द्वारे पुर्ण न करता रेल्वे मंत्रालयामार्फत पुर्ण करण्यासाठीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून राखडलेल्या ह्या रेल्वेमार्गाचे पांग फिटणार अशी आशा पुन्हा पुनर्जिवीत होताना दिसून येत आहे. आणि आता फलटण ते पंढरपूर असा 105 km चा रेल्वेमार्ग … Read more

बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

Eknath Shinde Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला विठुरायाची महापूजा करण्याचा मान मिळाला. यावेळी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे आणि सर्वाचं भलं होउदे असं साकडं एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला घातलं. … Read more

माऊलीच्या पालखी सोहळ्यावेळी कोणतीही गैरसोय नको; बांधकाममंत्री चव्हाणांचे प्रशासनाला आदेश

Ravindra Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि. 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यात असून फलटण मुक्कामी असणार आहे. या पालखीच्या मुक्कामी काळात पालखी सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होता कामा नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण … Read more

भगीरथ भालके राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत? पंढरपूरमध्ये तिरंगी लढत होणार?

bhagirath bhalke ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते आणि पक्षाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. त्यातच आता भगीरथ भालके यांच्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा यांनी विमान पाठवलं आणि भालके सुद्धा लगेच हेंद्राबादला गेल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे खरोखरच … Read more

पवारांनी भाकरी फिरवलीच; पंढरपूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून ‘हा’ उमेदवार?

sharad pawar pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असणारे अभिजित पाटील कोणत्या पक्षात जाणार याकडे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्य लागलं होते. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिजित पाटील हेच आगामी पंढरपूर- मंगळवेढा … Read more

खिलारे खून प्रकरणी कराडमधून 3 जणांना अटक

Karad Police

कराड | पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सुशांत बिल्लारे याच्या खून प्रकरणी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी कराड येथे तपास करीत या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तीन संशयिताना अटक केली आहे. अभय पाटील त्याचा कामगार बळीवंत तसेच भाऊसो माने याचा चुलत भाऊ राहुल माने अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या खून प्रकरणात … Read more

विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; 1 ठार, 35 जखमी

Accident Bus Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकाच्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून देवदर्शन करून भाविक पंढरपूरकडे निघाले होते. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने भाविकांनी भरलेली बस निघाली होती. बसमधील चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 35 जण … Read more