Tuesday, June 6, 2023

क्रिकेट विश्वातील रोमांचक आणि धमाकेदार अ‍ॅशेज कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातील अ‍ॅशेज कसोटी मालिकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. ह्या मालिकेची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिलेली असते. हि मालिका सर्वात रोमांचक आणि धमाकेदार असते. ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हि मालिका वर्षाच्या अखेरीस होणार आहे. आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशात होणाऱ्या पाच सामन्यांची तारीख आणि ठिकाणांची नावे जाहीर केली आहेत.

अ‍ॅशेज मालिकेच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तान संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षी हा सामना रद्द करण्यात आला होता. आता हा सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर यादरम्यान घेण्यात येणार आहे. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची अ‍ॅशेज मालिका खेळवण्यात येणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली कसोटीत ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान गाबा या ठिकाणी होणार आहे. १६ ते २० डिसेंबर दरम्यान डे नाइट कसोटी एडिलेड या ठिकाणी होणार आहे. तिसरी लढत २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न या ठिकाणी होणार आहे. चौथी कसोटी ५ ते ९ जानेवारी दरम्यान सिडनी या ठिकाणी होणार आहे. अंतिम सामना पर्थच्या मैदानावर १४ ते १८ जानेवारी दरम्यान होणार आहे.

अ‍ॅशेज मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी- ८ ते १२ डिसेंबर, गाबा
दुसरी कसोटी- १६ ते २० डिसेंबर, एडिलेड (डे-नाइड)
तिसरी कसोटी-२६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (बॉक्सिंग डे)
चौथी कसोटी- ५ ते ९ जानेवारी, सिडनी
पाचवी कसोटी- १४ ते १८ जानेवारी, पर्थ