Ashes Series: गाबा येथे जिंकण्यासाठी इंग्लंड पाहतोय 35 वर्षांपासून वाट,उद्यापासून सुरु होतोय क्रिकेटमधील थरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 8 डिसेंबरपासून अ‍ॅशेस सीरिज सुरू होत आहे. ही क्रिकेटमधील सर्वात जुनी सीरिज आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पुन्हा एकदा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने अ‍ॅशेसमध्ये 2800 धावा केल्या आहेत. त्याला अ‍ॅशेसमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. त्याने या सीरिजमध्ये आणखी 374 धावा केल्या तर तो स्टीव्ह वॉला मागे टाकून ते टॉप-4 मध्ये पोहोचेल.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजांच्या लिस्टमध्ये अ‍ॅशेसमध्ये 118 विकेट्स घेऊन 7व्या क्रमांकावर आहे. या सीरिजमध्ये त्याने आणखी 11 विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली आणि इंग्लंडचा इयान बॉथम यांना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. या दोन्ही दिग्गजांनी मिळून 128-128 विकेट घेतल्या आहेत.

या सीरिज मधील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे. इंग्लंडचा संघ 35 वर्षांपासून येथे एकही कसोटी जिंकू शकलेला नाही. त्यांनी शेवटचा विजय 1986 मध्ये मिळविला होता. त्यावेळी इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 12 तर इंग्लंडने 4 कसोटी जिंकलेल्या आहेत तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीतील रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 351 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने 146 कसोटी जिंकल्या आहेत. इंग्लंडने 110 सामने जिंकले आहेत तर 95 सामने अनिर्णित राहिले. या दोघांमध्ये ऑस्ट्रेलियात 180 कसोटी सामने झाले आहेत. ज्यामध्ये यजमानांनी 95 तर इंग्लंडने 57 कसोटी जिंकल्या आहेत.

जो रूट हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 56 पैकी 27 कसोटी जिंकल्या आहेत तर 21 मध्ये हार पत्करावी लागली आहे. मात्र, अ‍ॅशेसमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. त्याला 10 पैकी फक्त दोनच कसोटी जिंकता आलेल्या आहेत तर 6 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्स पहिल्यांदाच कसोटीत कर्णधारपद भूषवणार आहे. अलीकडेच टीम पेनने वादामुळे आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Comment