धुळे प्रतिनिधी | लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांवर जोरदार आगपाखड करत आहेत. भाजप हवाई हल्ल्याच राजकारण करत आहे आणि त्यापेक्षा त्यांनी युवा रोजगार, महिलांचं संरक्षण करायला भाजप ला सपशेल अपयश आल आहे. म्हणत कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकार वर टिका केली.
ते पुढे म्हणाले ‘देशात व राज्यात परिवर्तन झालं पाहिजे आणि देशाचं नेतृत्व राहुल गांधी यांनी केलं पाहिजे हि भावना लोकांमध्ये जाणवून येत आहे. लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम फडणवीस व मोदी सरकारने केलं आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात जसा भाजपचा सफाया झाला तसाच सफाया चहावाल्यांचा पण होणार आहे अशी शेलकी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मंत्रालयात उन्द्र आणि तुम्हाला दारिद्र्य अशा प्रकारचं काम सध्या सरकार करत आहे. पुलवामा हल्ल्याचा आपल्या जवानांनी चांगल्या प्रकारे बदल घेतला. त्यांचं कौतुकच आहे, पण लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी या परिस्थितीचा फायदा व्हावा म्हणून सभा घेत सुटलेल्या मोदींचा निषेध आहे. येत्या निवडणुकीत चहावाल्याला घरी बसवण्याचं आवाहन जनतेला केलं.